Monday, March 17, 2025
Homeजळगावदिवाळी आली पण शहरातील हायमास्टचा लखलखाट बंदच, लाखोंची बिले मात्र खर्ची

दिवाळी आली पण शहरातील हायमास्टचा लखलखाट बंदच, लाखोंची बिले मात्र खर्ची

दिवाळी आली पण शहरातील हायमास्टचा लखलखाट बंदच… लाखोंची बिले मात्र खर्ची !

फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरात सध्या दिवाळीची धामधुम सुरू आहे मात्र ऐन सणासुदीच्या काळात शहरातील प्रमुख रस्ते व कॉलनी भाग, नगर या भागातील हायमास्ट लाईट गेल्या दोन – तीन महिन्यापासून बंद अवस्थेत आहे . यावल रोड, मुख्य बाजारपेठ, विद्यानगर या भागात नवीन हायमास्ट दिवे लावण्यात आले तर काही ठिकाणी फाउंडेशन तयार केले मात्र पोल आणि दिवे लावले नाही. याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले की ठेकेदाराचा हलगर्जी पणा? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या भागातील दिवे त्वरीत सुरु करावे अशी नागरीकांची मागणी आहे.
शहरातील विविध भागात या हायमास्ट लाईट बसविण्यात आले . मात्र हे लाईट बंद आहेत. वारंवार ठेकेदाराला सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येते .ठेकेदाराकडून उडवा उडवाची उत्तरे देण्यात येतात . या तक्रारीची दखल कोणी घेत नसेल तर हे पोल ( हायमास्ट ) लाईट येथून हलवून टाकावेत अशी विद्यानगर भागातील रहिवांशाची तक्रार आहे. गणेश व दुर्गोत्सवात हे हायमास्ट लाईट बंद अवस्थेत होते आता मात्र दिवाळी सारख्या सणालाही जर लाईट बंद असतील तर त्याचा उपयोग काय ? वारंवार या बाबत तक्रार करून ही कोणी दखल घेत नाही. नगर पालिका म्हणते याची जबाबदारी आमची नाही. विज वितरण कंपनी म्हणते ते आमचे काम नाही आणि विशेष म्हणजे ठेकेदारही फोन उचलण्यास तयार नाही. वारंवार फोन करून रहिवांशी कंटाळले. या परिसरातील नागरिक या मानसिकतेत आले आहे की हायमास्ट फक्त देखावा आहे. जर का ठेकेदार हे काम पूर्ण करू शकत नसेल तर सार्वजनिक ठिकाणाहून ते दुसरीकडे हलविण्यात यावे अशी रहिवांशाची मागणी आहे. ऐन दिवाळीत व सणासुदीच्या काळात हायमास्टचे चार लाईट बंदच असतील तर त्याचा काय उपयोग ते फक्त ‘शो फिस ‘ ठरले आहे . दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. हायमास्टचे दिवेच बंद असतील तर त्याचा काय उपयोग. नगरपालिकेने बसविलेले लाईट हे त्यापेक्षा जास्त अधिक महत्वाचे आहे. वर्षानुवर्ष बसविलेले हे लाईट उत्तम आणि चांगली सुविधा देतात असे नागरिकांचे म्हणणे . शहरातील यावल – रावेर या मुख्य रस्त्यावर मार्गावर वाहतुकीची मोठी रहदारी असते.सुभाष चौका नेहमी बसलेला असतो मात्र येथील हायमास्ट लाईट सुरू होते. त्यामुळे सुभाष चौक चे वैभव या लाईटच्या प्रकाशामुळे सुंदर दिसत होते. प्रसंगी रात्रीच्या वेळेस ये जा करणाऱ्या वाहनास वाहतूक सुरळीत होत असे मात्र येथील हायमास्ट लाईट बंद असल्याने असल्याने सुभाष चौकातील रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची दाट शक्यता आहे
या प्रकाराबाबत हायमास्ट लाईट बंद असल्याने याबाबत वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येते याचे नवल फैजपूरवासीयांना वाटते. शहरातील ठराविक चौक व छोटे-मोठे राजकीय पदाधिकारी नेते, उपनेते, शहर प्रमुख यांच्या घराजवळच हायमास्ट लाईट मात्र सुरू असतात. इतर ठिकाणी ते बंद आहेत. ठेकेदाराकडून या प्रकाराकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करण्यात येत असल्याची ओरड येथील रहिवाशांची आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष घालून शहरातील विविध खांब्यावरील हायमास्ट दिवे प्रकाशित करावे अशी मागणी नागरिकांची आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या