Wednesday, March 26, 2025
Homeजळगावदिव्यांग व्यक्तिंनी शासकीय योजनांचा अवश्य लाभ घ्यावा : तहसीलदार निता लबडे

दिव्यांग व्यक्तिंनी शासकीय योजनांचा अवश्य लाभ घ्यावा : तहसीलदार निता लबडे

दिव्यांग व्यक्तिंनी शासकीय योजनांचा अवश्य लाभ घ्यावा : तहसीलदार निता लबडे

वरणगाव खान्देश लाईव्ह न्युज  प्रतिनिधी – दिव्यांग्यांनी शासकिय योजनांचा अवश्य लाभ घ्यावा परंतु शासनाची फसवणूक करू नका असे प्रतिपादन भुसावळ च्या तहसीलदार निता लबडे यांनी वरणगांव येथे केले.त्या दिव्यांग दिना निमित्त तेली समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री संत जगनाडे महाराज,छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पुजन करून मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी तहसिलदार निता लबडे,रजनी संजय सावकारे,मुख्याधिकारी सचिन राऊत,सपोनि जनार्दन खंडेराव,शामल झांबरे ‘ वैशाली देशमुख, राजेंद्र चौधरी, सुभाष वाघ,अजय पाटील,मडळ अधिकारी फिरोज खान,तलाठी मंगेश पारीसे,पहेलवान नामदेव मोरे,सुपडू सोनवणे,संतोष माळी,सुरेश चौधरी, देवीदास चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तहसिलदार निता लबडे यांनी सांगितले की, दिव्यांग्यामध्ये क्षमता जास्त असते शासन स्तरावर त्यांच्या साठी योजना आहे त्यांच्या साठी पाठपुरावा करावा लागतो योग्य कागद पत्र असल्यास काम लवकर होते.दिव्यांग्यांना मदत करणे हे सर्वाचे कर्तव्य आहे .कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरणगाव दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सुनिल शेटे,शेख रफीक, रहेमान शाहा,जिनेंद्र सेतवाल,शेख बशीर,देविदास चव्हाण,सुनिल पाटील,रामा शिवरामे,संतोष देशमुख,सुकराम माळी,रमेश बाभुळकर आदीसह दिव्याग संघटना कार्यकारी मंडळ व सर्व दिव्यांग बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरकणी फाउन्डेश च्या अध्यक्षा सविता माळी यांनी केले. व सूत्रसंचालन महेश सोनवणे यांनी केले तर आभार निलीमा झोपे यांनी मानले .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या