Monday, March 24, 2025
Homeजळगावदिव्यांग व सामाजिक बहूउद्देशिय संस्थेचा सन्मान

दिव्यांग व सामाजिक बहूउद्देशिय संस्थेचा सन्मान

दिव्यांग व सामाजिक बहूउद्देशिय संस्थेचा सन्मान
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव, रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने रोटरी भवन जळगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निवासी जिल्हाधिकारी भीमराज दराडे साहेब यांच्या हस्ते दिव्यांग व सामाजिक बहूउद्देशिय संस्थेचे व यावल तालुका दिव्यांग सेना अध्यक्ष मुन्ना उर्फ योगेश चौधरी, मार्गदर्शक राहुल कोल्हे, उपाध्यक्ष चेतन तळेले, सदस्य भगवान कोळी, सोनू कोळी यांना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि प जळगाव विजय रायसिंग साहेब, दिव्यांग पुनर्वसन केंद्र संचालक एस पी गणेशकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी घनश्याम महाजन, दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन, मुकुंद गोसावी, रेडक्रॉस उपाध्यक्ष गनी मेमन, वै. सा. का अधिकारी माधुरी भागवत, मीनाक्षी निकम, गणेश पाटील, हितेश तायडे, जितू पाटील उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमांमध्ये दिव्यांगांना साहित्य वाटप, दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन दिव्यांग क्षेत्रात सेवा देणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या