Wednesday, March 26, 2025
Homeजळगावदि.30 सप्टेंबर रोजी प्रकाश आंबेडकर चोपड्यात

दि.30 सप्टेंबर रोजी प्रकाश आंबेडकर चोपड्यात

दि.30 सप्टेंबर रोजी प्रकाश आंबेडकर चोपड्यात

दिनांक 30 सप्टेंबर 2024 सोमवार रोजी चोपडा येथे वंचित बहुजन आघाडी व भारत आदिवासी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने “आदिवासी सत्ता परिवर्तन परिषद”आयोजित करण्यात आली असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा. खासदार प्रकाश आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील समविचारी आदिवासी पक्ष, संघटना यांच्याशी जवळीक साधत राज्याच्या राजकारणात एक नवीन समीकरण दलित- आदिवासी-ओबीसी यांच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात विविध तीन शहरात आदिवासी सत्ता परिवर्तन परिषद होत असून चोपडा येथे देखील ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे.
वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी विधान सभेचे संभाव्य उमेदवार जाहीर केले आहेत .
भारत आदिवासी पार्टीचे मुख्य संरक्षक तसेच नवनिर्वाचित खासदार राजकुमार रोत (राजस्थान) देखील या परिषदेस उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

परिषदेस दलित आदिवासी ओबीसी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या आवाहन परिषदेचे निमंत्रक भारत आदिवासी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष सुनील गायकवाड, वंचितच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील,युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार,महिला जिल्हा अध्यक्षा वंदना सोनवणे,महासचिव एडवोकेट योगेश तायडे,जिल्हा उपाध्यक्ष अशोक बाविस्कर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या