Monday, March 17, 2025
Homeजळगावदुर्देवी घटना : बसमध्ये हृदयविकाराने वृद्धाचा मृत्यू

दुर्देवी घटना : बसमध्ये हृदयविकाराने वृद्धाचा मृत्यू

दुर्देवी घटना : बसमध्ये हृदयविकाराने वृद्धाचा मृत्यू

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील पहूर येथील प्रगतिशील शेतकरी तथा भाविक एकादशीच्या कार्यक्रमासाठी हाळदा, डकला येथे जात असतांना वाटेतच बसमध्ये त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.मयत भाविक कडुबा हिरामण पाटील (वय ७६) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, ३ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते येथील रोजगार हमी योजनेचे माजी तालुकाध्यक्ष, तथा केवडेश्वर महादेव पतसंस्थेचे चेअरमन समाधान पाटील, अनिल पाटील यांचे वडील होत. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या