देशाच्या उभारणीत महिलांचे योगदान महत्वाचे…
ना . रक्षाताई खडसे यांचे प्रतिपादन
मुक्ताईनगर – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी महिला सन्मान आणि विकासाचा पाया संविधानाच्या माध्यमातून घातला गेला .संविधानाने व्यक्ती म्हणून महिलांचा केलेला सन्मान समतेचे आदर्श प्रतीक आहे .त्यामुळे महिलांचा कुटुंब ,समाज व राष्ट्र विकासात सहभाग झाला .त्यामुळेच देश विकासात महिलांचे योगदान महत्वाचे आहे .भारतीय राज्यघट नेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या अधिकारांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या बाबी राज्यघटनेत समाविष्ट केल्या आहेत असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री ना . रक्षाताई खडसे यांनी केले आहे.
त्या कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे लिखित ‘संविधानाचे अमृतपर्व ‘ (भारतीय राज्यघटना समितीतील महिला प्रतिनिधींची ओळख)या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभा प्रसंगी त्या बोलत होत्या .
कार्यक्रमास आमदार एकनाथराव खडसे ,प्राचार्य प्रमोद पवार , प्राचार्य किशोर कोल्हे , माजी मुख्याध्यापक श्री.पी.एस .लोखंडे ,प्रा.डॉ. जतीन मेढे ,प्रा .डॉ.दिनेश पाटील ,प्रा .डॉ.गणेश चव्हाण ,प्रा.डॉ.दिनेश महाजन ,पत्रकार दीपक महाले ,अथर्व प्रकाशनाचे प्रमुख श्री.युवराज माळी,सौ.विनिता सुनील नेवे आदी मान्यवर उपस्थित होते .
संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत संविधान सभा आणि संविधान मसुदा समिती यांचे योगदान महत्वाचे आहे .संविधान सभेत २९६ सदस्यांपैकी १५ सदस्य या महिला होत्या .
संविधानाचे अमृतपर्व लक्षात घेवून त्या पंधरा महिलांचे जीवन ,कार्य आणि परिचय या ग्रंथात एकत्र अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे .
या प्रसंगी आमदार एकनाथराव खडसे यांनी ही मनोगत व्यक्त केले .त्यांनी
संविधान सभेतील या पंधरा महिला सदस्यांची माहिती या निमित्ताने एकत्रित उपलब्ध होऊन अभ्यासकांना हा ग्रंथ नक्कीच महत्वपूर्ण ठरेल ,असे सांगितले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा . डॉ.जतीन मेढे यांनी केले तर आभार प्रा .डॉ.सुनील नेवे यांनी मानले