देहविक्री प्रकरण : भिंतीवरून उडी मारून बांगलादेशी तरुणी फरार!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – देहविक्री प्रकरणात शासकीय आशादीप महिला वसतिगृहात असलेली १९ वर्षीय बांगलादेशी तरुणी शनिवारी रात्री या वसतिगृहातील स्वच्छतागृहाच्या भिंतीवरून उडी मारून पसार झाली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी परिसरातील हॉटेलमध्ये टाकलेल्या छाप्यात ही बांगलादेशी तरुणी आढळली होती. तिच्याकडे पासपोर्ट, व्हिसा अथवा भारतात वास्तव्याची कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे तिच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. २२ डिसेंबरपासून ही तरुणी शासकीय आशादीप महिला वसतिगृहात होती.
हा प्रकार घडला त्यावेळी आशादीप वसतिगृहातील कनिष्ठ काळजीवाहक मनीषा किरण पाटील, सुरक्षारक्षक वैशाली विजय पाटील, महिला पोलिस परवीन तडवी या नाइट ड्युटीवर होत्या. तीन-तीनजणी असताना बांगलादेशी तरुणीने पलायन केल्याने येथील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह आहे