Wednesday, March 26, 2025
Homeभुसावळदोन अल्पवयीन मुले ५ दिवसांपासून बेपत्ता !

दोन अल्पवयीन मुले ५ दिवसांपासून बेपत्ता !

दोन अल्पवयीन मुले ५ दिवसांपासून बेपत्ता !

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील रसलपूर येथील दोन्ही अल्पवयीन मुले पाच दिवसांपासून बेपत्ता झाली आहेत. भुसावळ रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून रेल्वेगाडीत बसत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज आढळून आले आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांना फूस लावून पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,याप्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसलपूर येथील दोन अल्पवयीन मुले आहेत. २२ रोजी पहाटे घरातील कुटुंब उठल्यानंतर मुलगा दिसला नाही. त्याच्या मित्राकडे तपास करण्यासाठी गेले असता तो नसल्याचे निर्देशनास आले. दोन्ही कुटुंबीयांनी शोधाशोध केली. यातील एकाच्या मोबाइलवर संपर्क केला असता होऊ शकला नाही. दरम्यान, भुसावळ रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता २२ रोजी रेल्वेत बसताना दिसत आहेत. याप्रकरणी रावेर पोलिसांत अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ. सतीश सानप तपास करीत आहेत.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या