Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हादोन कुटुंबियांमध्ये जोरदार वाद : अॅट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल !

दोन कुटुंबियांमध्ये जोरदार वाद : अॅट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल !

दोन कुटुंबियांमध्ये जोरदार वाद : अॅट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भाऊ प्रियकर असल्याचा आरोप केल्याने त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबियांमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी तिघांनी तरुणीला मारहाण करुन तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजी पाटील, अश्विनी पाटील व तिच्या आईविरुद्ध अॅट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील राधाकृष्ण नगरात तृष्णा अजय सपकाळे ही तरुणी वास्तव्यास आहे. दि. ३ रोजी सायंकाळी ती बहीण रागिणी हीला घेवून मिथीला अपार्टमेंटमधील किराणा दुकानात गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या मेडीकलची मालकीण अश्विनी यांनी रागिनी हीला तुझ्या सोबत नेहमी येत असतो, तो तुझा भाऊ नसून प्रियकर आहे असे म्हणाली. त्यावर त्या दोघ बहिणींनी तो आमचा भाऊ शौर्य असून तू विनाकारण प्रियकर असल्याचा आळ का घेतला याची विचारणा केली. त्या कारणावरुन त्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यावेळी त्या दोघांच्या कुटुंबातील सदस्य देखील त्याठिकाणी आले. आळ घेतल्याचा जाब विचारल्या राग आल्याने तिघांनी तृष्णा आणि रागिणी सपकाळे यांना मारहाण केली. तसेच या भांडणात एका महिलेचे शर्ट फाटल्याने त्यांना त्याबाबत विचारणा केली. त्यावरुन शिवाजी पाटील यांनी त्यांना जातीवाचक बोलून नादाला लागले तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती.
घटनेच्या दिवशी तृष्णा सपकाळे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. तक्रार देतांना ती तरुणी गोंधळलेली असल्याने त्यांना जातीवाचक शब्द उच्चारुन अपमान कारक वागणूक दिल्याची घटना सांगायचे राहून गेले होते. दरम्यान, गुरुवारी याप्रकरणी तक्रार दिली असून त्यानुसार तिघांविरुद्ध अॅट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित करीत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या