Tuesday, April 29, 2025
Homeजळगावदोन घरांना अचानक भीषण आग : दोघ भावंडांच्या संसाराची राखरांगोळी !

दोन घरांना अचानक भीषण आग : दोघ भावंडांच्या संसाराची राखरांगोळी !

दोन घरांना अचानक भीषण आग : दोघ भावंडांच्या संसाराची राखरांगोळी !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील घराला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत घरातल संपुर्ण साहित्य जळून खाक झाल्याने दोघ भावंडांच्या संसाराची राखरांगोळी झाली. तसेच शहरातील भवानी पेठेत डीपीला आग लागल्याची घटना देखील घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील पांडुरंग कुंभार व प्रकाश कुंभार या दोन भावांचे कुंभारवाडा भागात एकत्र घर आहे. सोमवारी ते कामावर गेलेले असताना शॉर्ट सर्कीटमुळे त्यांच्या घरात आग लागली. आग वाढत जाऊन घरातील टीव्ही, पंखा, धान्य, कागदपत्रे, कपडे व संपुर्ण साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे ७० हजारांपेक्षा जास्त नुकसान झाले असून दोघंही भावांचा संसार उघड्यावर आला आहे. डोळ्यासमोर संपुर्ण घराची राखरांगोळी झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते.
शहरातील भवानी पेठ भागात एका सुवर्ण पेढीजवळ विद्युत डीपीला आग लागली. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विसनजीनगरात कचऱ्याला आग लागली. यामुळे या परिसरात घबराट पसरली होती. अग्नीशमन विभागाचा बंब पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या