दोन झोपड्यांना आग लागून शेळीच्या १६ पिल्लांचा होरपळून मृत्यू !
भडगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील गुढे फाट्याजवळ एका वस्तीतील दोन झोपड्यांना आग लागून यात शेळ्यांचे १६ पिल्लू होरपळून ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली.
गुढे फाट्यावर २५ ते ३० कुटुंबांचा रहिवास आहे. मोलमजुरी करून ते आपली उपजीविका चालवतात. त्यातील गुलाब सुखदेव भिल्ल हे पत्नी व मुलांसह वास्तव्यास आहेत. एका झोपडीत संसार तर दुसऱ्या झोपडीत शेळ्यांसाठी गोठा बनवलेला होता. त्यांच्याकडील ४० शेळ्या चरायला गेल्या होत्या. त्यांची पिल्ले मात्र गोठ्यातच होती. या आगीत ही पिल्ले होरपळून ठार झाली. या आगीत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने या परिवाराचे साधारण एक लाखाचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही