Wednesday, March 26, 2025
Homeक्राईमधक्कादायक : एकाने केला महिला पोलिसाचा विनयभंग !

धक्कादायक : एकाने केला महिला पोलिसाचा विनयभंग !

धक्कादायक : एकाने केला महिला पोलिसाचा विनयभंग !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – क्रिकेटचा बॉल घेण्यासाठी सरळ घरात येणाऱ्या तरुणाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलिसाचा विनयभंग व पोलिसांना अश्लील शिवीगाळ, दमदाटी करण्याचा प्रकार १० रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील एका भागात घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मोईन ऊर्फ मोना सलीम खाटिक (२८) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.परजिल्ह्यातील पोलिस दलात कार्यरत महिला कर्मचारी सुटीसाठी शहरात आली होती. दुपारी तीन वाजता गल्लीत काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यावेळी क्रिकेटचा बॉल घेण्यासाठी मोईन खाटिक घरात आला. त्याला महिला पोलिसांना रोखले. त्याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर तेथे आलेल्या पोलिसांनाही शिवीगाळ केली. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ७४,२९६,३५२,३२९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या