धक्कादायक : घर बांधकामासाठी पैसे न दिल्याने मुलाकडून वडिलांना मारहाण !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सेवानिवृत्तीच्या रकमेतून दोन लाख रुपये न दिल्याच्या रागातून मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकूड मारून गंभीर जखमी केल्याची घटना कंडारी येथे ६ मार्च दुपारी २.३० वाजता घडली.
याबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात दिलीप गणपत महाजन (वय ६२) यांनी तक्रार दाखल केली. त्यांचा मुलगा हेमंत महाजन याने घर बांधकामासाठी वडिलांकडे पैसे मागितले, परंतु त्यांनी नकार दिल्याने त्याने त्यांच्यावर हल्ला केला. तपास पो. कॉ. विकास बाविस्कर करीत आहेत. दरम्यान, या घटेनबाबत परिसरातील रहिवाशांनी मुलाच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.