Monday, March 24, 2025
Homeआत्महत्याधक्कादायक : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या !

धक्कादायक : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या !

धक्कादायक : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या !

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील विवरे येथे वीटभट्टीवर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या पती- पत्नीने दि. ३ रोजी दुपारी १:३० वाजता गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
अनिल देवीदास हरणकार (३८) आणि शीतल अनिल हरणकार (३२) अशी मयतांची नावे आहेत.त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, असा परिवार आहे. सपोनि हरिदास बोचरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी घनश्याम हरणकार यांनी फिर्याद दिली. यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. या दोघांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या