भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील न.पा.शाळा क्रमांक ३५ मध्ये विद्यार्थ्यांना आहार पुरवण्यात आलेल्या सोयाबीन बड़ी पुलावाच्या सोयाबीन बड्यांमध्ये धनोर (मृत) आढळून आल्याची घटना ता.१फेब्रुवारी रोजी घडल्याने खळबळ उडाली आहे .
याबाबत माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी फोन वरून पालिका मुख्याधिकारी यांना कळविले की,न.पा.शाळा क्रमांक ३५ या शाळेवर १ फेब्रुवारी रोजी पुरविण्यात आलेल्या सोयाबीन बड़ी पुलावाच्या सोयाबीन बड्यांमध्ये धनोर (मृत) आहेत.त्यावरून दुपारी साडे बारा वाजेला पोषण आहार अधीक्षक यांनी सोयाबीन बडी पुलावाच्या सोयाबीन वड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली असता सोयाबीन वडयांमध्ये धानोर (मृत) आढळून आलेत. आहार विद्यार्थ्यांना खावू घातलेला नाही त्याबदल्यात विद्यार्थ्यांना वरण-बट्टी उपलब्ध करून देण्यात आली आहे.आहार पुरवठादार ललीत कोळी यांनी ते दवाखान्यात असल्याने येवू शकणार नाहीत असे कळविले आहेप्रभारी नगरपालीका प्रशासक अधिकारी हे रजेवर असल्याने पंचनाम्यासाठी उपस्थित राहू शकत नाही असे कळविले होते.
सदर प्रकाराबाबत मुख्याधिकारी नगरपालीका भुसावळ यांना कळविण्यात आले असुन पुढील कारवाईसाठी त्यांचेकडे प्रस्ताव पाठवून संबधितावर कारवाई करण्यात येणार आहे.तक्रारदार महेंद्रसिंग ठाकूर यांनी या अगोदरही दोनदा पुरवठ्यातून यांना आहारात झुरळ व खिळा निघाल्याबाबत समज दिली आहे असे सांगितले.लोकशाही महिला गृहउद्योग सह-सोसायटी संचलीत केंद्रीय स्वयंपाक गृह प्रणाली मार्फत आहार शाळेवर कामगार कैलास बडगुजर हे घेवून आले होते.उर्वरित शाळांवर हा आहार दिलेला नाही असे त्यांनी सांगितले.सदरील पंचनामा तक्रारदार कैलास बडगुजर,श्रीमती मनीषा तायडे,महेंद्रसिंग ठाकूर,योगेश सपकाळे, पंकज ठाकूर,हेमंत सोनवणे,यास्मिनबी सिकंदर( मदत निस शालेय पोषण आहार),अजित तडवी ( शापोआ अधिक्षक पंचायत समिती), गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे,जगदीश पाटील न.पा.शिक्षण मंडळ,हेमांगी पाटील न.पा.उप.शी.शाळा क्रमांक ३५,जयश्री ठोसरे न.पा.उप.शी.शाळा क्रमांक ३५ भुसावळ यांच्या समक्ष करण्यात आला आहे.
सदरील पंचनामा सोमवार ३ फेब्रुवारी रोजी पालिका मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या कडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी दिली.