Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हाधक्कादायक : स्कूल बसखाली ५५ वर्षीय इसम जागीच ठार !

धक्कादायक : स्कूल बसखाली ५५ वर्षीय इसम जागीच ठार !

धक्कादायक : स्कूल बसखाली ५५ वर्षीय इसम जागीच ठार !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील अकलूद येथे शुक्रवारी सकाळी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बसच्या धडकेत ५५ वर्षीय इसम ठार झाला. हा अपघात पहेलवान ढब्याजवळ चालक बस मागे घेत असताना घडला. घटनेनंतर बस चालक तेथून पसार झाला.

या घटनेची माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आल्यावर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अकलूद, ता. यावल या गावाजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे. शुक्रवारी सकाळी या स्कूलची बस (एमएच २१/ बीएच ०६१३) घेऊन चालक हा गावाजवळील पहेलवान यांच्या ढाब्यासमोर होता. बस मागे घेत असताना या बसची धडक लागल्याने पंडित मोहन बादशाह (५५, रा. कासवे) हे जागीच ठार झाले. ते दाढी कटींग करायला आले होते. या अपघातानंतर चालक घाबरून बस सोडून तेथून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली व तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.फैजपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर चौधरी, हवलदार विकास सोनवणे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. पंचनामा करून बसदेखील ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पाडळसा पोलिस पाटील सुरेश खैरनार यांच्या खबरीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या