धक्वकादायक : कोमात गेलेल्या रुग्णाचा अपघात दाखवून विम्याचे पैसे मिळवले ; तिघांना अटक !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी फाट्याजवळील साईबाबा मंदिराजवळी, महामार्गावर सन २०२३ मध्ये अपघात झाल्याचा बनाव करत मयताच्या नावे असलेल्या विम्याचे पैसे मिळवल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार मयताच्या चुलत बहिणीने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तिघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव येथील पिंप्राळा परिसरातील शरद किसन जगताप (वय ३८) हे आजारामुळे कोमामध्ये गेले होते. या वेळी जळगावच्या मेहरुण, लक्ष्मी नगरमधील राजु सुभाष गुजारे (वाणी, वय ४५) याने यातील मयताच्या नातेवाईकांना विम्याचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने यातील मयत शरद जगताप यांचा मुक्ताईनगर तालुक्यातील बोहार्डी फाटा येथील अपघात झाल्याचे दाखवून वरणगाव पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा करताना त्याच्यासोबत या कटात सहभागी असलेला, खोटी फिर्याद देणारा घनशाम अमृत सपकाळे (वय २७, रा. एरंडोल) या जळगाव येथील रुग्णवाहिका चालक योगेश प्रकाश वाणी (वय ३०) याने मदत केली. यानंतर जगताप याचा एक कोटी रुपयाचा विम्याला क्लेम करून ८३ लाखांचा क्लेम मंजूर करून घेतला.
याप्रकरणी मयताची बहीण जयश्री कढरे यांनी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली. तर, या प्रकरणाची चौकशी केली असता हा बनावट प्रकार उघडकीस आल्याने या तिघांना अटक करण्यात आली. या तिनही आरोपींना गुरुवारी भुसावळ येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सपोनि जनार्दन खंडेराव, हवालदार एस. जे. सावकारे, संजू बनसोडे करत आहेत.