Wednesday, March 26, 2025
Homeजळगावधनाजी नाना महाविद्यालयात संविधान परीक्षेचे आयोजन

धनाजी नाना महाविद्यालयात संविधान परीक्षेचे आयोजन

धनाजी नाना महाविद्यालयात संविधान परीक्षेचे आयोजन फैजपूर : प्रतिनिधी  खानदेश लाईव्ह न्युज
तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर ‘’संविधान दिनाच्या’’ निमित्यानं विद्यार्थी शिक्षक पालक व सर्व नागरिकांना भारतीय संविधानाची ओळख व्हावी व त्यांच्या मूलभूत अधिकार व कर्तव्याची जाणीव व संविधानाची जनजागृती व्हावी या हेतूने दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने संविधान परीक्षा घेण्यात आली परीक्षेसाठी १८८ विद्यार्थी व शिक्षक यांनी रजिस्ट्रेशन केले.
त्यात १३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत प्रथम- राधा राजेंद्र वाणी, द्वितीय- सानिका संजय मेढे, तृतीय- शेख मुस्तायीन शेख अन्सार तर प्रोत्साहनपर विजयी झालेले मयुरी सुनील रायपूरकर, निखिल रवी इंगळे यांनी मिळवले.
संविधान परीक्षेचे आयोजन प्राचार्य डॉ.आर.बी. वाघुळदे यांच्या मार्गदर्शनात व उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. जाधव, डॉ. मनोहर सुरवाडे, डॉ. कल्पना पाटील, डॉ. हरीश नेमाडे यांच्या सहकार्याने राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ताराचंद सावसाकडे प्रा. पल्लवी तायडे, प्रा. मंजुश्री पवार श्री. चिराग चौधरी यांनी परीक्षा आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या