‘धनाश्री’नियतकालिक अंकास क.ब.चौ.उ.म. विद्यापिठाची दोन बक्षिसे जाहीर…. फैजपूर : खानदेश लाईव्ह प्रतिनिधी तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिक धनाश्री (2023- 24) या अंकास आंतर महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत दोन बक्षिसे प्राप्त झाले. धनाश्री अंकाच्या उत्कृष्ट मांडणीचे तृतीय बक्षीस रुपये 3000/- तसेच हिंदी विभागातील उत्कृष्ट कविता या विभागात ‘नन्ही कली’ या कवितेस एस. वाय. बी. ए. वर्गातील काजल हुकुमचंद बारेला या विद्यार्थिनी 750/- रुपयाचे द्वितीय बक्षीस जाहीर झाले आहे. धनाजी नाना महाविद्यालयाच्या धनाश्री अंकास गौरवपूर्ण कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिरीष दादा चौधरी, उपाध्यक्ष श्री सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष श्री. मिलिंद शंकर वाघुळदे, चेअरमन श्री. लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन श्री. किशोर रामदास चौधरी, सचिव श्री. मुरलीधर तोताराम फिरके, सहसचिव श्री नंदकुमार भंगाळे व सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ. आर. बी.वाघुळदे , उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.जाधव, डॉ. मनोहर सुरवाडे,डॉ.कल्पना पाटील ,डॉ. हरीश नेमाडे यांनी , धनाश्री चे संपादक डॉ.शरद लहू बिऱ्हाडे व सहसंपादक डॉ. राजेंद्र राजपूत, डॉ. सतीश पाटील डॉ. पंकज सोनवणे यांचे संस्था परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.