Monday, March 24, 2025
Homeजळगावधनुर्विद्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे धनाजी नाना महाविद्यालयात आयोजन

धनुर्विद्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे धनाजी नाना महाविद्यालयात आयोजन

धनुर्विद्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे धनाजी नाना महाविद्यालयात आयोजन
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी येथील धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत धनुर्विद्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. धनुर्विद्या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड व कंपाऊंड राऊंड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे सर व उद्घाटक म्हणून वनस्पतीशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा. डी. आर. तायडे सर हे उपस्थितीत होते. प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्हि. जाधव, जीमखाना समिती चेअरमन प्रा. डाॅ. ए. के. पाटील सर, प्रा. डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे, प्रा. डाॅ. मुकेश पवार, प्रा. डॉ. महेश पाटील, प्रा. माधुरी नारखेडे मॅडम आदि उपस्थित होते.
सदरील स्पर्धेत जळगाव विभागातील सात पुरुष व पाच महिला संघानी सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रा. डी. आर. तायडे यांनी खेळातील नियमीत सराव हाच विजयी करतो. तसेच धनुर्विद्या सारख्या खेळात तर लक्ष केंद्रित करून खेळावे लागते त्या मुळेच यात जास्त सराव आवश्यक आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे सर यांनी धनुर्विद्या हा प्राचीन काळापासून भारतात खेळला जाणारा क्रीडा प्रकार आहे. आधुनिक युगात धनुर्विद्या सारख्या खेळातून विद्यार्थ्यांना मनाला एकाग्र करून निश्चित धेय्य भेदण्याचे कार्य या खेळातून साध्यकेले जाते. विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी हा क्रीडा प्रकार खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहे. कारण या खेळात यश प्राप्त करण्यासाठी निश्चित धेय्य ठरवावे लागते नंतर ते साध्य करण्यासाठी मनला एकाग्र करून लक्ष भेद करून विजेतेपद प्राप्त केले जाते. विद्यार्थाने जीवनात यशस्वी होण्यासाठी धेय्य निश्चित करून नियमीत प्रयत्न केले तर नक्किच यशस्वी होता येते हे सांगितले. या सोबतच सर्वांनीच खेळाकडे एक करिअर म्हणून पाहिले पाहिजे व त्या उद्देशानेच खेळाचा नियमीत सराव करून आपले, राज्याचे व देशाचे नाव लौकिक करावे असे सांगितले आणि सर्व खेळाडूंनी सहभाग घेतल्या बदल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
धनुर्विद्या पुरूष गटात धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर- प्रथम, कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद व्दितीय आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, फैजपूर- तृतीय तसेच महिला गटात धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर- प्रथम, कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद व्दितीय आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, फैजपूर- तृतीय विजयी झाले. विजय झालेले खेळाडू विभागीय स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयात सहभागी होतील.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन चे पंच यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले तर आभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा. डॉ. ए. के. पाटील सर, प्रा. डाॅ. गोविंद मारतळे, प्रा. उत्पल चौधरीसर, प्रा. शिवाजी मगर आणि राजेंद्र ठाकुर यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या