Sunday, March 16, 2025
Homeजळगावधरणगाव तालुक्यात आढळला तरुणाचा मृतदेह !

धरणगाव तालुक्यात आढळला तरुणाचा मृतदेह !

धरणगाव तालुक्यात आढळला तरुणाचा मृतदेह !

धरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील बोरगाव शिवारातील शेतकरी धनगर यांच्या शेतात आज दुपारी २ वाजता एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी तरुणाचे डोकं व एक हात वेगळा होता. तसेच कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याचे दिसून आले. तर हिंस्र प्राण्यांनी हल्ला केल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता या वेळी वर्तवण्यात आली.

घटनास्थळी वनपाल अनिल साळुंखे, वनरक्षक सुनील तोडकर, गणेश धानोरे, वन मजूर शांताराम पाटील, गजानन सैंदाणे यांनी भेट देऊन शेतातील घटनास्थळाची पाहणी केली. धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. जितेंद्र चव्हाण यांनी जागेवरच मृदेहाचे शवविच्छेदन केले. या संदर्भात त्यांनी रिपोर्ट सादर केला असून तो नाशिक येथे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तर धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले, एपीआय नीलेश वाघ, पोलीस कर्मचारी सत्यवान पाटील, योगेश पाटील, पंकज पाटील, वर्षा गायकवाड, दीपक पाटील आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करुन पंचनामा ही केला आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात बांभोरी बुद्रुक येथील धर्मेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या