Thursday, March 27, 2025
Homeजळगावधानवड-पिंपळे शिवारात आढळले मानवी शरिराचे अवशेष !

धानवड-पिंपळे शिवारात आढळले मानवी शरिराचे अवशेष !

धानवड-पिंपळे शिवारात आढळले मानवी शरिराचे अवशेष !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव तालुक्यातील धानवड-पिंपळे शेत शिवारात मानवी शरिराचे अवशेष मिळून आल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन ते अवशेष जिल्हा रुग्णालयात आणले. पोलिसांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,जळगाव तालुक्यातील धानवड- पिंपळे शिवारातील शेतात जात असलेल्या तरुणाला शेतात मानवी शरिराचे काही अवशेष दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील सविता ग्यान व चंद्रकांत आवारे यांना दिली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, त्याठिकाणी मानवी शरिरातील कवटी आणि हातापायासह इतर अवशेष दिसून आले. त्यांनी लागलीच याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविले.मानवी अवशेष आढळून आल्याचे समजताच पोलीस निरीक्षकांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणाहून त्यांनी मानवी अवशेषांचा पंचनामा करुन ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या