Monday, March 17, 2025
Homeगुन्हाधारदार शस्त्राचा धाक दाखवून बकऱ्या नेल्या चोरून !

धारदार शस्त्राचा धाक दाखवून बकऱ्या नेल्या चोरून !

धारदार शस्त्राचा धाक दाखवून बकऱ्या नेल्या चोरून !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे शिवारात तीन चोरट्यांनी शेतातील शेडच्या तारा कापून आत प्रवेश करत शेत मालकास धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तब्बल १९ बोकड व ७ बकऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला तिघा चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिंगोणे येथील परशुराम रूपला चव्हाण यांच्या शेतातच शेळी पालनासाठी लोखंडी शेड बांधलेले आहे. या शेडमध्ये १० बकऱ्या व १९ बोकड असे होते. १७ रोजी सायंकाळी ७:३० वाजता जेवण करून परशराम चव्हाण हे शेतात शेडवर झोपण्यासाठी गेले. बकरींच्या शेडचा पत्र्याचा दरवाजा आतून लावून शेडच्या बाजूस आलेल्या खाटेवर झोपले.रात्री २ वाजता त्यांना बकरी ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने जाग आली. त्यावेळी तिघांनी त्यांना पकडले. आणि शस्त्राचा धाक दाखवून १९ बोकड आणि सात बकऱ्या चोरून नेल्या आहेत. परशुराम चव्हाण यांनी बुधवारी ग्रामीण पोलिस स्टेशन गाठून ही आपबिती पोलिसांना सांगितली.

दरम्यान, त्यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण परदेशी करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या