Monday, April 28, 2025
Homeगुन्हाधार्मिक भावना दुखावल्याने वरणगाव फॅक्टरी कर्मचारी निलंबित

धार्मिक भावना दुखावल्याने वरणगाव फॅक्टरी कर्मचारी निलंबित

धार्मिक भावना दुखावल्याने वरणगाव फॅक्टरी कर्मचारी निलंबित

वरणगांव प्रतिनीधी खानदेश लाईव्ह न्युज ,
वरणगांव फॅक्टरी येथील कर्मचाऱ्याने व्हॉटस गृपवर महापुरुषाचा अवमान होईल असे अवमानकारक शब्द लिहून अवमान केल्याने त्यांच्यावर वरणगाव पोलिसात कारवाई करण्यात आली होती.वरणगाव फॅक्टरी प्रशासनाकडे युनियने मागणी लाऊन ठेवल्याने जातीय सलोखा बिघडू नये म्हणून फॅक्टरी प्रशासने नागपूर रिजनच्या आदेशानुसार मुख्यमहाप्रबंधक यांनी अशोक व्यवहारे यांचेवर अनुशासकीय कारवाई करत आज दि ३० सोमवार रोजी निलंबित केले आहे.

याबाबत अधिक माहिती,आयुध निर्माणी वरणगाव येथिल कर्मचारी अशोक दशरथ व्यवहारे हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या विषयी वाईट बोलत असतो.यांने दि २८ डिसेंबर रोजी त्यांच्या स्थानिक केशॉप आय इ एस व्हाट्सअप ग्रुपवर महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्याविषयी खूपच अरवाच्छ भाषेत,एकेरी खालच्या पातळीत लिखाण करून संपूर्ण वरणगाव फॅक्टरी अधिकारी,कर्मचारी यांच्या भावना दुखावल्या होत्या.या अनुषंगाने वरणगाव फॅक्टरी इंटक युनियन,कामगार युनियन व इंडीपेन्डेट युनियन यांनी महाप्रबंधक यांना निवेदन देण्यात आले होते.व्यवहारे यांचे वर वरणगाव व बोडवड तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता.परिस्थिती,व जातीय सलोखा बिघडू नये म्हणून वरणगाव फॅक्टरी प्रशासनाने नागपूर रिजनच्या आदेशानुसार मुख्यमहाप्रबंधक यांनी अशोक व्यवहारे यांच्यावर अनुशासकीय कारवाई करत आज सोमवार रोजी निलंबित केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या