Monday, March 24, 2025
Homeगुन्हाधावत्या रेल्वेतून प्रवासी महिलेची सोन्याची साखळी चोरी ; २ वर्षे सश्रम कारावासाची...

धावत्या रेल्वेतून प्रवासी महिलेची सोन्याची साखळी चोरी ; २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा !

धावत्या रेल्वेतून प्रवासी महिलेची सोन्याची साखळी चोरी ; २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – धावत्या रेल्वेतून प्रवासी महिलेची २५ ग्रॅम सोन्याची साखळी जबरीने चोरून नेल्याप्रकरणी आरोपी राजकुमार उर्फ साधू कडू दौडे (३२, रा. नेपानगर) यास भुसावळ रेल्वे न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ३ रोजी सुनावली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ११ मे २०१९ रोजी अन्नू सुरेंद्र हरजानी या हबीबगंज एक्स्प्रेस भोपाळ ते मुंबई असा आरक्षित डब्यातून प्रवास करीत असताना भुसावळ रेल्वे स्टेशनवरून गाडी सुटल्यावर १:०० वाजेच्या सुमारास आरोपीने आऊटरजवळ फिर्यादी महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बळजबरीने ओढून पलायन केले होते. त्यावरून या महिलेने रेल्वे पोलिसात फिर्याद दिली होती.रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून भुसावळ रेल्वे न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. भुसावळ रेल्वे न्यायालयात न्या. व्ही. बी. साळुंखे यांचे न्यायासनासमोर या खटल्याचे कामकाज चालले. सरकारी वकील नितीन खरे यांनी फिर्यादी अन्नू हरजानी, पंच शेख रियाज, पोलिस साक्षीदार सुधीर पाटील, तपासी अंमलदार पीएसआय अनिल केरूरकर असे चार साक्षीदार तपासले. आरोपीचे निवेदन व जप्ती पंचनामा यावरील पंचांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. याकामी पैरवी अधिकारी गणेश शिरसाठ यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या