धूम स्टाईलने चोरी : चोरट्यांनी दिली तीन गुन्ह्याची कबुली !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जुना खेडी रोड परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव पोलिसांनी आसोदा गावातून रविवारी दुपारी २ वाजता अटक केली आहे. गणेश राजेंद्र माळी (वय २९, रा. आसोदा) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून २३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शनि पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सोनसाखळी चोरीच्या वेगवेगळ्या घटनांचा सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर तपास सुरू होता. शनिपेठ पोलिसांनी संशयित गणेश राजेंद्र माळी याला आसोदा गावातून अटक केली आहे. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सपोनि साजित मंसुरी, पोउनि योगेश ढिकले, पोहेकों विजय खैरे, पोकों विक्की इंगळे, मुबारक देशमुख, पंकज खडसे यांनी ही कारवाई केली.