Wednesday, March 26, 2025
Homeजळगावनगरपालिका प्रशासन "मुर्दाबाद मुर्दाबाद" अशा घोषणा देत भुसावळात आंदोलकांनी सर्वांचे लक्ष वेधून...

नगरपालिका प्रशासन “मुर्दाबाद मुर्दाबाद” अशा घोषणा देत भुसावळात आंदोलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले!

भुसावळात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खड्यात बसुन केले आंदोलन

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील प्रत्येक रस्त्यावर जीव घेणे खड्डे निर्माण झाले आहेत. वाहनधारकांना वाहन चालवणे मुश्किल झाले आहे. खड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बाबतचा निषेध करण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जामनेर रोडवर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खड्यात बसुन भुसावळकर जागा हो आंदोलनाचा धागा हो !! खड्डे मुक्त भुसावळ असा फलक हातात घेऊन नगरपालिका प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा देत आंदोलन करीत शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.

संततधार पावसामुळे भुसावळ शहरातील प्रत्येक रस्त्यावर जीव घेणे खड्डे निर्माण झाले आहेत. खड्यामुळे दररोज वाहन चालक घसरुन पडत असल्याच्या घटना देखील घडत आहेत. खड्यामुळे वाहनधारकांना मणक्याचे विविध आजार जडले आहेत. या रस्त्यावर पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे.नगरपालिका प्रशासना कडून तात्पुरती रस्त्याची डागडुगी केली जाते. मात्र पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती निर्माण होत आहे. याचा तीव्र निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून खड्यात बसुन नगरपालिका प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला आहे. जर भुसावळ शहरातील रस्ते गणपती विसर्जनाच्या आधी नगरपालिका प्रशासनाने तयार केले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे. जोपर्यंत नगरपालिका प्रशासन अधिकारी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्विकारणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही. अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश ठाकुर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र निकम, नगरपालिकेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी गटनेते उल्हास पगारे, घरेलू कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू डोंगरदिवे , काँग्रेसचे शहर सरचिटणीस संतोष साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या