Wednesday, March 26, 2025
Homeजळगावनगरपालिकेकडून भुसावळ बसस्थानक कार्यालय केले सील; धनादेश जमा केल्यावर सील काढले

नगरपालिकेकडून भुसावळ बसस्थानक कार्यालय केले सील; धनादेश जमा केल्यावर सील काढले

नगरपालिकेकडून भुसावळ बसस्थानक कार्यालय केले सील; धनादेश जमा केल्यावर सील काढले

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील बस स्थानकाची मागील पाच वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी रु. 5,10,919/- इतकी होती. बस प्रशासनाला वारंवार पालिकेकडून नोटीस विनंती करूनही संबंधित थकबाकी रक्कम न भरल्याने, आज दि.25 फेब्रुवारी 2025 रोजी भुसावळ बसस्थानक व्यवस्थापक प्रमुख यांच्या कार्यालयास सील लावण्याची कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई उपमुख्य अधिकारी शेख परवेज अहमद, प्रशासकीय अधिकारी अजित भट, दिपक अहिरे, मुकेश पाटील, आस्थापना प्रमुख वैभव पवार, तसेच भाग कारकून जितेंद्र झांबरे, तौसिफ खान आणि जय पिंजणी यांच्या संयुक्त पथकाद्वारे मंगळवारी करण्यात आली होती

या कारवाईनंतर बसस्थानक व्यवस्थापकाकडून धनादेशाद्वारे रु. 2,07,945/- थकबाकी रक्कम जमा केल्यानंतर कार्यालयाचे सील काढण्यात आले आहे. उर्वरित रक्कम 15 दिवसांत अदा केली जाईल अशी हमी भुसावळ बस व्यवस्थापकाकडून देण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. प्रशासक व मुख्याधिकारी भुसावळ नगरपरिषद यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तसेच, भुसावळ शहरातील इतर सर्व मालमत्ता थकितांना आवाहन करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर कराची रक्कम नगरपालिका कार्यालयात जमा करून सहकार्य करावे. अन्यथा, यापुढे थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची व गरजेनुसार पाणी कनेक्शन खंडित करण्याची कारवाई भुसावळ नगरपालिका कडून केली येईल.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून शासनच शासकीय कार्यालयाला सील लावते या कारणांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या