नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी तातडीने १५ फेब्रुवारीच्या आत सोडा या मागणीसाठी वरणगावकरांचे तापी नदी पात्रात तीन तास जलसमाधी
अन्यथा २० फेब्रुवारी पुन्हा जन आक्रोश माजी नगराध्यक्ष सुनील काळे !
मुख्यधिकारी सचिन राऊत पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना तुकाराम कोळी यांनी तापी माईचे पाणी हातात देवून घ्यायला लावली शप्पथ!
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे मात्र नगरपालिकेच्या पालघरजीपणामुळे पाणी योजनेचे काम पूर्ण होत नाही नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी हे 15 फेब्रुवारीच्या 16 तसेच विकास कॉलनी पवन नगर प्रतिभा नगर येथील मंजूर पाण्याच्या टाकीचे काम सुरू करा तसेच तापी नदी पात्रात नवीन जागवेल मंजूर करा नगरपरिषद जून्या इमारतीत प्रभाग कार्यालय सुरू करा या मागणीसाठी आज तापी नदीपात्रामध्ये वरणगावकरांची तीन तास जलसमाधी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात उपनगराध्यक्ष शेख लाख जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे कामगार नेते मिलिंद मेढे मेढे तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर डॉ सादिक शेख मुस्लिम भाई अन्सारी हाजी कदिर शेठ नाना चौधरी योगेश माळी सुभाष माळी युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश निमकर तुकाराम कोळी नामदेव सोनवणे अजमल खान फजल शेख संदीप. माळी मयूर शेळके भोजराज पालवे राजू धोबी अमृत लाला मुरायी भगवान धनगर अंबादास चौधरी तालुका उपाध्यक्ष किरण धुंदे राहुल जंजाळे दशरथ गोसावी विशाल चौधरी भाऊलाल टिंटोरे सोनू शेख मनीष भंगाळे संतोष रॉक अनिल कोळी किरण भिल राहुल धूंदे नरेंद्र बावणे सागर कोळी अनिल काळे यावेळी मुख्याधिकारी सचिन राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी तापी नदी पात्रात येऊन सर्व कार्यकर्त्यांची चर्चा केली व 15 फेब्रुवारी च्या आत नारीमाळा येथील शिवाजीनगर येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून पूर्ण गावाला पाणीपुरवठा करू व चार ते पाच दिवसाच्या आड वरणगावकरांना पाणी देण्यात येईल तसेच विकास कॉलनी प्रतिभा नगर पवन नगर येथील पर्यायी जागेवर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू करण्यात येईल तसेच कठोरा येथील तापी नदी पात्रात नवीन ज्यकवेल व इंटॅक्ट वेल मंजूर करण्याचा प्रस्ताव तातडीने जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात येईल अशा प्रकारचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी सचिन राऊत व पाणीपुरवठा अभियंता जनार्दन पवार मुक्तार खान दीपक काळे यांनी यावेळी लेखी आश्वासन दिले व सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी सर्व कार्यकर्त्यांना तापी नदीपात्रातून बाहेर काढले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी निर्वाणीचा इशारा दिला की १५ फेब्रुवारी च्या आत नवीन पाणी योजनेचे पाणी न सोडल्यास २० फेब्रुवारी रोजी महिला व नागरिकांचा मोर्चा आंदोलन करण्यात येईल उन्हाळ्याच्या आत वरणगाव सुरू असलेली पाणी टंचाई सोडवली नाहीतर यापुढे आक्रमक स्वरूपाचे आंदोलन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत प्रशासनाच्या विरुद्ध केले जाईल असा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी तापी नदी पात्रातच दिला यावेळी असंख्य नागरिक जलसमाधीला उपस्थित होते तापी नदी पात्रात मध्यभागी जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम काका कोळी व हाजी कदिर शेठ यांनी जाऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रशासनाने विनंती करून सर्व तापी नदी पात्राच्या बाहेर सर्व नागरिकांना आणले व सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी मी स्वतः यामध्ये लक्ष घालून वरणगावकरांना पिण्याचे पाणी 15 फेब्रुवारी यात कसे दिले जाईल यासाठी प्रयत्न करणार आहे यांनी जर न केल्यास 20 फेब्रुवारीला तुम्ही आंदोलन करा मी तुमच्या सोबत असेल असे यावेळी सांगितले