Tuesday, April 29, 2025
Homeजळगावनवीन वर्षात भुसावळमार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल !

नवीन वर्षात भुसावळमार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल !

नवीन वर्षात भुसावळमार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून हा बदल १ जानेवारी २०२५ पासून लागू झाला आहे. विशेष यात जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या ४५ रेल्वेच्या वेळेत अंशतः बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेची वेळ तपासून प्रवास करावा, जेणेकरून गैरसोय होणार नाही.

भुसावळ विभागातील ३२ पॅसेंजर, मेमू विशेष क्रमांक असलेल्या गाड्या नियमित क्रमांकासह नवीन वर्षापासून धावू लागल्या आहेत. नुकतीच रेल्वे प्रशासनाकडून त्या रेल्वेंची यादी प्रसिद्ध केली आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेची वेळ तपासून प्रवास करावा, जेणेकरून गैरसोय होणार नाही, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गाड्यांच्या वेळेत बदल झालेल्यांमध्ये ११०३९ कोल्हापूर- गोंदिया एक्स्प्रेस, १२१०१ लोकमान्य टिळक- शालिमार एक्स्प्रेस, १२१०२ शालिमार लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, १२१०६ गोंदिया- मुंबई एक्स्प्रेस, १२१२९ पुणे- हावडा एक्स्प्रेस, १२१३० हावडा- पुणे एक्स्प्रेस, १२१४५ लोकमान्य टिळक- पुरी एक्सप्रेस, १२१४६ पुरी लोकमान्य टिळक एक्सप्रेस, १२१५१ लोकमान्य टिळक शालिमार एक्स्प्रेस, १२१५२ शालिमार लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, १२२२१ पुणे- हावडा दुरंतो एक्स्प्रेस, १२२६१ मुंबई- हावडा दुरंतो एक्स्प्रेस, १२८०९ मुंबई- हावडा मेल, १२८१० हावडा- मुंबई मेल, १२८११ हटिया एक्स्प्रेस, १२८१२ हटिया- लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, १२८३३ अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस, १२८४४ अहमदाबाद- पुरी एक्स्प्रेस, १२८४३ पुरी- अहमदाबाद एक्स्प्रेस, १२८५० पुणे- बिलासपुर एक्सप्रेस, १३४२६ सुरत- मालदा टाउन एक्स्प्रेस, १३४२५ मालदा टाउन- सूरत एक्स्प्रेस, १२८५९/१२८६० गीतांजली एक्स्प्रेस, १२८६९ मुंबई- हावडा, १२८७० हावडा- मुंबई एक्स्प्रेस, १२८७९/१२८८० भुवनेश्वर एक्स्प्रेस, १२९०५ पोरबंदर- शालिमार एक्स्प्रेस, १२९०६ शालिमार पोरबंदर एक्सप्रेस, १२९९३ गांधीधाम पुरी एक्सप्रेस, १२९९४ पुरी गांधीधाम एक्स्प्रेस, १३४२६ सुरत मालदा टाउन एक्स्प्रेस, १३४२५ मालदा टाउन सुरत एक्स्प्रेस, २०८२१ पुणे संतरागाची एक्स्प्रेस, २०८२२ संतरागाची पुणे एक्स्प्रेससह ४५ रेल्वेंच्या वेळेत अंशतः बदल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या