नवोदय उड्डाणपुलाच्या खाली अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम गंभीर
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहराजवळील महामार्गावर नवोदय उड्डाणपुलाच्या खाली भुसावळकडून जळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महामार्ग ओलांडणाऱ्या अज्ञात व्यक्तीला जोरदार धडक दिली. यात हा अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
या व्यक्तीला महामार्ग रुग्णवाहिकेद्वारे जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल वाल्मिक सोनवणे व जगदीश भोई घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अज्ञात वाहन व व्यक्तीचा रात्री उशिरापर्यंत तपास लागू शकला नाही. जखमी व्यक्तीच्या अंगात लाल रंगाचा टी-शर्ट होता. ही धडक वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने दिल्याची चर्चा परिसरात होती. अवैध वाळू वाहतुक करणारी वाहने वेगाने धावतात. याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता