नशिराबाद टोल नाक्यावर फास्ट टॅग यंत्रणा बंद पडल्याने सर्व वाहनधारकांची मोठी पिळवणूक आणि आर्थिक लूट !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावल जळगाव महामार्गावर नशिराबाद जवळील टोल नाक्यावरील फास्टट्रॅग यंत्रणा बंद पडल्याने वाहनधारकांकडून नुसार रोख रक्कम घेऊन पावती दिली जात आहे यात वाहनधारकांची जास्त रक्कम आणि जास्त वेळ जात असल्याने टोल नाक्यावर वाहनधारकांची आर्थिक मिरवणूक व लूट होत असल्याने याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून फास्ट टॅग यंत्रणा तत्काळ सुरू करावी अशी संपूर्ण भुसावळ विभागात चर्चा आहे.
कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावर बनवलेल्या टोल नाक्यावर गाड्यांना १० सेकंदहून जास्त वेळ प्रतीक्षा करायला लागू नये असा नियम आहे.जर असं होत असेल तर तुम्ही कोणताही टॅक्स न देता तेथून जावू शकता.कोणत्याही टोल नाक्यावर १०० मीटरहून जास्त लांब गाड्यांची लाइन असायला नको.नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI ने गेल्यावर्षी देशातील प्रत्येक टोल नाक्यावर प्रत्येक वाहनांसाठी १० सेकंद हून जास्त सर्विस टाइम नसणार अशी गाइडलाइन्स जारी केली होती. मे २०२१ मध्ये जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार, ज्यावेळी टोल नाक्यावर सर्विस टाइम १० सेकंद पेक्षा जास्त असल्यास कोणताही टोल न देता गाडी चालक जावू शकतो.सर्विस टाइमचा अर्थ टोल टॅक्स वसूल करून गाडीला टोल बूथ हून पुढे जाण्यास लागणारा वेळेतील आहे. या नवीन नियमाचे काम टोल नाक्यावर गाड्यांना लागणार वेळ कमी करण्यासाठी आहे. नवीन गाइडलाइन्सच्या अनुसार, टोल नाक्यावर गाड्यांची लाइन १०० मीटर हून जास्त असता कामा नये.
संस्थेने हेही म्हटले की, प्रत्येक टोल बूथहून १०० मीटर आधी एक पिवळी पट्टी बनवली जाईल. यावरून याची माहिती होईल.अशा प्रकारे वाहनधारकांच्या सोयीसाठी आणि हितासाठी विविध नियम असले तरी नशिराबाद टोल नाक्यावर फास्ट टॅग ऑनलाइन यंत्रणा बंद पडल्याने टोल नाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनधारकांकडून सोयीनुसार, रोख रक्कम घेऊन पावती दिली जात असल्याने तसेच या प्रक्रियेत वाहनधारकांचा जास्त वेळ जात असल्याने वाहनधारकाची मानसिक पिळवणूक व आर्थिक लूट होत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून ऑनलाइन फास्ट टॅग यंत्रणा तात्काळ सुरू करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.