Monday, March 17, 2025
Homeजळगावनशिराबाद येथे भरधाव चारचाकीच्या धडकेत ६९ वर्षीय वृद्ध जागीच ठार

नशिराबाद येथे भरधाव चारचाकीच्या धडकेत ६९ वर्षीय वृद्ध जागीच ठार

नशिराबाद येथे भरधाव चारचाकीच्या धडकेत ६९ वर्षीय वृद्ध जागीच ठार

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भरधाव चारचाकीने धडक दिल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेले ६९ वर्षीय वृद्ध हे जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी रात्री नशिराबाद येथे झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अब्दुल हमीद शेख ईस्माईल (६९, रा. नशिराबाद) असे मयत प्रौढाचे नाव आहे, पेंटर असलेले अब्दुल हमीद शेख ईस्माईल हे गुरुवारी रस्त्याच्या कडेला उभे होते. (केसीएन) त्यावेळी जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यानंतर चालक न थांबता वाहनासह पसार झाला. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी चारचाकीचा पाठलागही केला, मात्र तो सापडला नाही. अपघातग्रस्तास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. धडक देणाऱ्या कारवर कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी रुग्णालयात केली. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या