नाकाबंदी करत असताना पुण्यातील युवकाकडे सापडले गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस !
चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – चोपडा-शिरपूर रस्त्यावरील अकुलखेडा टोलनाक्याजवळ नाकाबंदी करत असताना पुणे येथील आकाश गणेश चव्हाण या युवकाकडे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना दि. २३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दि. २३ रोजी १० वाजेच्या सुमारास निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलिसांनी चोपडा-शिरपूर रस्त्यावरील अकुलखेडा टोल नाक्याजवळ नाकेबंदी करत असताना पुणे-तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेला आकाश गणेश चव्हाण (२४, ह. मु. वाल्मीक नगर, पनवेल) हा दुचाकी (एमएच१४/केएल४३०३) चोपड्याकडे येत असताना त्याला पोलिसांनी अडवले.दरम्यान, त्याच्याकडे २५ हजार किमतीचा एक गावठी कट्टा व दोन हजार किमतीचे दोन जिवंत काडतूस, पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी असा ७७ हजारांचा मुद्देमाल आढळून आला आहे. त्यावरून पोलिसांनी आकाश चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याच्यावर चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि योगेश्वर हिरे हे करीत आहेत.