नागपुरातील खून प्रकरणी दोघे आरोपींना भुसावळ येथे अटक !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरे तसेच स. फौ. गुलाब सोनार नाशिक क्राईम युनिट-2 यांनी कळविले की, नागपूर येथे खून करून मुंबईला पळून गेलेले संशयित दोनआरोपी हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसने भुसावळच्या दिशेने प्रवास करीत असतांना रेल्वे स्टेशनवर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे .
घटनेची माहिती मिळाल्यावर ए.सी.पी अभिजित पाटील नागपूर यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पथकास रेल्वे स्थानकावर पाचारण करून रेल्वे पोलीस निरीक्षक पी. आर. मीना यांची भेट घेवून हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस मधून नागपूर खुन प्रकरणातील दोघे आरोपीना संयुक्त कारवाई करीत अटक करण्यात आली.
यादरम्यान नागपूर येथील धंतोली पोलीस स्टेशनला संशयित आरोपी भुषण अशोक ठाकरे, वय-१९ रा. नवाबपुर मस्जिद जवळ, ताजसाई बिर्याणी जवळ, नागपुर, आकाश सदाशिव वाघमारे, वय- २१, रा. नवाबपुर मस्जिद जवळ, ताजसाई बिर्याणी यांचे सह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्यातील संशयित आरोपी गुन्ह्या घडल्यापासून फरार होते.याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरे तसेच स. फौ. गुलाब सोनार नाशिक क्राईम युनिट-२ यांनी बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली की, नागपूर येथे खून करून फरार झालेले संशयित आरोपी नागपुर हे ट्रेन नं, १२८६९ यामध्ये प्रवास करत तात्काळ बाजारपेठचे निरीक्षक राहुल वाघ यांनी पोलीस उप निरीक्षक राजु सांगळे, पोलीस हवालदार विजय नेरकर, निलेश चौधरी, भुषण चौधरी, मोहम्मद जाफर यांना सदर गुन्ह्या बाबत माहीती देवून रेल्वे स्टेशन भुसावळ येथे पाठविले. त्यांनी रेल्वे पोलिस निरीक्षक पी आर मीना, इम्रान खान, महेन्द कुशवाह, जोगेद्रं नेरपगार, सीटी रामकृष्ण काकोडीया यांचे मदतीने दोघे संशयितांना ताब्यात घेवून बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले. सदर दोन्ही आरोपी यांना गुन्हा बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असे कबुल केले आहे.सदर दोन्ही आरोपी यांना सुस्थितीत आपले कडील नेमणुकीचे पोलीस उप निरीक्षक नवनाथ देवकाते, युनिट क्रमांक-३, गुन्हे शाखा, नागपुर यांचे ताब्यात दिले आहे.