नायलॉन मांजा विक्री : एक अटकेत !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – इलेक्ट्रिक दुकानात नायलॉन मांजा विक्री होत असताना, शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत महेंद्र कैलास गोयल (१९, रा. सागरनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा हजार ७०० रुपये किमतीच्या नायलॉन मांजाच्या नऊ चक्री जप्त करण्यात आल्या.या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सागरनगरामध्ये नायलॉनचा मांजा विक्री होत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यांनी पोउनि. योगेश ढिकले, पोलिस नाईक किरण वानखेडे, विकी इंगळे, मुकुंद गंगावणे यांना कारवाईच्या सूचना दिल्या.पथकाने महेंद्र गोयल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा हजार ७०० रुपयांचा नायलॉनचा मांजा जप्त केला. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गोयलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल विजय खैरे करीत आहेत.