निधन वार्ता : बॉम्बे चौपाटी भेळचे संस्थापक पंडितराव सुरवाडे यांचे दुःख निधन !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील बॉम्बे चौपाटी भेळ चे संस्थापक , मामाजी टॉकीज जवळ वास्तव्यात असलेले पंडितराव नामदेव सुरवाडे (वय ७५) यांना बुधवार 4 डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेला देवाज्ञा झाली.
त्यांची अंत यात्रा बुधवारी दुपारी ३ वा. राहत्या घरून करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुली,दोन मुले, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते दीपक सुरवाडे व संदीप सुरवाडे यांचे वडील होत.