Thursday, March 27, 2025
Homeगुन्हानिलंबित ‘त्या’ महिला पोलिस कर्मचारीचा मित्र अखेर ताब्यात !

निलंबित ‘त्या’ महिला पोलिस कर्मचारीचा मित्र अखेर ताब्यात !

निलंबित ‘त्या’ महिला पोलिस कर्मचारीचा मित्र अखेर ताब्यात !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या निलंबित महिला पोलिस कर्मचारी अर्चना पाटील हिचा मित्र मिरखा नुरखा तडवी याला रावेर तालुक्यातून ताब्यात घेण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत निलंबित महिला पोलिस कर्मचारी अर्चना पाटील हिने फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्हे दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. अखेर शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तडवी याला रावेर तालुक्यातून ताब्यात घेतले. अर्चना पाटील ही ठाणे पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी मुंबई महापालिकेत काम करायची. तेथे मिरखा नुरखा तडवी हादेखील कामाला होता व तेथे दोघांची ओळख झाली.

दरम्यान, त्यानंतर अर्चना पाटील पोलिस दलात दाखल झाल्यानंतर जळगावला बदली झाली तरी तडवी व तिची मैत्री कायम आहे. फसवणूक प्रकरणातही तडवीविरुद्ध गुन्हा दाखल असून त्याच्या खात्यावर काही रक्कम स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या