निळे निशाण संघटनेत शेकडो महिला व पुरुषांनी केला प्रवेश.
यावल दि.२९ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
दि .२९ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे निळे निशाण संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला या प्रवेश सोहळ्यात शेकडोयावल तालुक्यातील शेकडो स्रीया व पुरुषांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान्यवर कांशिरामजी यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्य निळे निशाण संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून संघटनेत प्रवेश केला त्याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विलास बोरिकर,सदाशिव निकम,जिल्हा सचिव शरद बाविस्कर,ॲड प्रविण इंगळे, फैजपुर विभाग उपाध्यक्ष अनिल इंधाटे,इकबाल तडवी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे व यावल तालुका युवक अध्यक्ष सागर तायडे यांनी परिश्रम घेतले .