Thursday, March 27, 2025
Homeगुन्हानेतेगिरीचा प्रभाव असलेले अवैध वाळूचे १ वाहन पकडण्यासाठी महसूल पथकाने मागिविल्या पोलिस...

नेतेगिरीचा प्रभाव असलेले अवैध वाळूचे १ वाहन पकडण्यासाठी महसूल पथकाने मागिविल्या पोलिस ३ व्हन.

नेतेगिरीचा प्रभाव असलेले अवैध वाळूचे १ वाहन पकडण्यासाठी महसूल पथकाने मागिविल्या पोलिस ३ व्हन!

अवैध वाळू तस्करीत राजकीय प्रभावाने महसूल आणि पोलीस पथक हतबल.

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – अवैध गौण खनिज वाहतुकीत नेतेगिरीचा,राजकारणाचा, दादागिरीचा प्रभाव आणि दबाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे १ अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडण्यासाठी,कारवाई करणेसाठी महसूल पथकाला तब्बल ३ पोलीस गाड्या / व्हॅन बोलवाव्या लागल्याची घटना नुकतीच घडल्यामुळे मात्र महसूल आणि पोलीस दलाची मोठी दमछाक होत असल्याचे भुसावल विभागात बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भुसावळ शहरात अवैध गौणखनिज उत्खन्नन व वाहतुकीस प्रतिबंध करणेकामी महसूलपथक गस्तीवर असतांना जळगांवकडून भुसावळ कडे येत असतांना मालवाहतुक पिवळया रंगाचे एम.एच.१९-सी. वाय.१९- ८३८८ हे डंपर वाहन राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ सुहास हॉटेलच्या पुढे तपासणी कामी दि. २८ रोजी रात्री १०:२० वाजता थांबविण्यात आले वाहन तपासले असता सदर वाहनात अवैध वाळु ( रेती ) या गौणखनिजाची वाहतुक केले जात असलेबाबत दिसुन आले.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, वाहन चालक यांचे कडेस सदर गौणखनिज वाहतुकी बाबत परवाना अथवा पावती यांची मागणी केली असता वाहन चालक यांचे कोणत्याही प्रकाराचा परवाना अथवा पावती नव्हती वाहन चालक चंद्रकांत वासुदेव कोळी रा. कानसवाडी ता.जि.जळगांव यांचे कडेस वाहनाचे कागदपत्रे मागणी केली असता त्याकडेस सदरवेळी कोणत्याही प्रकाराचे कागदपत्रे नव्हते तसेच वाहन चालविण्याचा परवाना देखील नव्हता अवैधरीत्या गौणखनिज वाहतुक करीत असतांना आढळुन आले, कारवाई करताना वाहन चालकाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच विविध प्रकारे दबाव,दादागिरी तंत्राचा वापर करण्यात आल्याने महसूल पथकाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ३ व्हॅन घटनास्थळी तात्काळ बोलवाव्या लागल्या आणि सदर वाहन जप्त करुन वाहन व वाहनाचा पंचनामा केलेला असुन पंचानी वाहनातील वाळु हया प्रकाराचे गौणखनिजाची वाहतुक होत असल्याचे नमुद केलेले असुन अंदाजे २ ब्रास वाळु सदरच्या वाहनात असल्याचे नमुद केलेले आहे सदर पंचनामा प्रकरण महसूल विभागात दाखल आहे.
वाहन मालक दिपक जानकीराम वारुळे रा.जळगांव ता.जि.जळगांव यांचे मालकीचे असुन सदरचे महाराष्ट्र महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ ( ७ ) व ( ८ ) नुसार वाहनावर दंडात्मक कार्यवाही होणे कामी वाहन तहसिल कार्यालयात जमा केलेले असुन सदरची कारवाई मंडळ अधिकारी भुसावळ प्रफुल्ल कांबळे,ग्राम महसुल अधिकारी पवन नवगाळे,कोतवाल जितेश चौधरी यांनी केली. ही कारवाई करताना महसूल पथकाला पोलिसांच्या तीन व्हॅन बोलवाव्या लागल्याने अवैध कौन खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असली तरी अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर कारवाई करताना राजकीय सामाजिक गुंडगिरी यांच्या प्रभावामुळे महसूल आणि पोलीस पथक प्रथम दर्शनी हतबल झालेले दिसून येत असले तरी अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर कारवाई करण्यासाठी मोठी कसरत करून पोलीस आणि महसूल संयुक्तपणे कारवाई करावी लागत असल्याचे भुसावळ विभागात बोलले जात आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या