न्याय मिळणे साठी संजय वराडे यांचा आत्मदहनाचा इशारा
संजय वराडे यांच्या वर झालेला अन्याय दूर करावा यासाठी उपोषणा साठी मागणी केली असता अडगळीच्या जागी जी एस ग्राउंड वर उपोषण करण्याचे सांगितले जाते त्यामुळे आत्मदहन करण्याचा इशारा वराडे यांनी दिला आहे .
चिंचोली येथे इलेक्ट्रिक सामान चोरी व ईच्छा देवी चौकात अवैध गॅस रिफिलिंग चे बळी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालया समोर व डी एस पी कार्यालया समोर उपोषणाची परवानगी नाकारण्यात आली आहे .
शासन न्याय मिळवून देत नाही तर आंदोलन करू देत नाही म्हणून शेवटी ७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे वराडे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे .
याची सर्व जबाबदारी शासनाची राहील असेही पत्रकात म्हटले आहे .