न्याय हक्कासाठी ओबीसी बांधवांनो एक व्हा : राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक
-भुसावळला समता परिषदेच्या बैठकीत ओबीसी बांधवांना आवाहन
भुसावळ – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी अठरा पगड जाती पातीत विभागल्या गेलेल्या ओबीसी बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ,आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. संविधानाने आम्हाला खूप काही दिले परंतु आमच्या हक्कांसाठी आम्ही जागृत आणि संघटित नसल्याने आम्ही सर्वांगीण विकासापासून मागे पडत आहोत. आपल्या सर्वांगीण विकासासाठी संविधानाने दिलेले हक्क आबाधीत राहण्यासाठी एकत्र या असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी केले.
भुसावळ येथील ओबीसी बांधवांच्या तालुका बैठकीत बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून परिषदेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक अनिल नाळे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रा.जतिन मेढे, रावेर विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी, कृष्णा माळी होते.
याप्रसंगी भुसावळ शहरातील भोरगाव लेवा पंचायत भुसावळ अध्यक्ष सुहास चौधरी, नेवे वाणी समाजाचे अध्यक्ष प्रा. सुनील नेवे सर, दिनेश भंगाळे, धोबी समाजाचे अध्यक्ष कैलास शेलोडे, शिशिर जावडे, अजय पाटील, मार्केट कमिटीचे चेअरमन अनिल वारके, संचालक संजय पाटील, आर.जी. चौधरी, सुभाष भंगाळे, अक्षय भारंभे, संघपाल सपकाळे, लेवा समाज महिला अध्यक्षा मंगला पाटील यासह विविध ओ.बी.सी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते. ओबीसी जनगणना, ओबीसी बांधवांचे शैक्षणिक व सामाजिक प्रश्न , ओबीसी बांधवांच्या रोजगाराच्या समस्या आदी विषयांवर या प्रसंगी महत्वपूर्ण चर्चा झाली. आगामी काळात ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा जळगाव येथे महामेळावा होणार आहे. त्या मेळाव्याला भुसावळ तालुक्यातील बारा बलुतेदार ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती देतील असेही या बैठकीत सांगण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. जतीन मेढे यांनी केले. आभार संतोष माळी यांनी मानले.