जळगाव/- खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शेतीमध्ये उल्लेखनीय काम करणार्या शेतकर्यांना बहूमान मिळावा या उद्देशाने ” आमची माती आमची माणसं व जय किसान फार्मर्स फोरम ” तर्फे भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. नाशिक येथील गंगापूर रोड परिसरातील रावसाहेब थोरात ऑडिटोरियम ( सभागृहात ) झालेल्या या भव्य समारंभात जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी सचिन देवराम इंगळे सौ.योगिता इंगळे यांना खासदार श्री. भास्करराव भगरे यांच्या शुभहस्ते गौरविण्यात
आले..याप्रसंगी माजी खासदार व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत हे अध्यक्षस्थानी होते. तर,” इफको ” ( दिल्ली ) च्या संचालिका साधना जाधव , मुंबई आकाशवाणीचे संचालक डॉ.संतोष जाधव ,कृषिभूषण आणि सेंद्रिय शेतीतज्ञ सदाशिव शेळके , आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त कृषी शास्त्रज्ञ,संशोधक डॉ.जयराम पूरकर डॉक्टर्स किसानचे डॉ.सुनील दिंडे ,अन्न महामंडळाचे सदस्य बापू शिंदे ,उद्योजक पांडुरंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सेंद्रिय शेतीवर चर्चासत्र, आमची माती आमची माणसं मासिकाचा “शेतकरी गौरव विशेषांक आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ.जयराम पुरकर लिखित ‘ शाश्वत सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे ‘ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध गायिका सुखदा महाजन यांचा सुमधुर गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक डॉ.संजय जाधव यांनी केले. या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे निवेदन जळगावचे कलावंत आणि प्रसिद्ध निवेदक तुषार वाघुळदे यांनी केले आभार निवृत्ती न्याहारकर यांनी मानले.
Contact 9405057141
● तुषार वाघुळदे