पटेल वाड्यात बलात्काराची घटना यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
यावल दि.१५ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुक्यातील दहिगाव येथील पटेल वाड्यात सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याची शर्मनाक घटना घडल्याने फिर्याद दिल्यावरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दहिगाव येथील पटेल वाड्यातील एका कुटुंबातील सुनेने यावल पोलिसात तक्रार दिली की दि. १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान दहिगाव येथे तिचे सासऱ्याचे घरी तिचा सासरा वेळोवेळी चाकूचा धाक दाखवीत बळजबरीने / जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवत होता त्यानुसार यावल पोलिसात तिच्या सासऱ्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १२८ ऑब्लिक २५ प्रमाणे भारतीय न्याय संहिता २०२३ कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार सुनील मोरे व सहकारी करीत आहेत. यामुळे संपूर्ण दहिगाव ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली.