पत्नीला फ्रेड रिक्वेस्ट पाठविल्याचा जाब विचारल्याचा रागाने दोघांनी पतीला केली मारहाण !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कारणाने नेहमीच हाणामारीच्या घटना घडत असतांना आता पत्नीला फ्रेड रिक्वेस्ट पाठविल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने दोघांनी जयेश जयप्रकाश जेवलानी (रा. ३०, रा. सिंधीकॉलनी) यांना बॅटसह लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना दि. २३ रोजी सिंधी कॉलनीतील संत कंवरराम प्रायमरी स्कुलसमोर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील सिंधी कॉलनीतील नेत्रज्योती हॉस्पिटलसमोर राहणारे जयेश जयप्रकाश जेवलानी यांच्या पत्नीला संशयित साहील मकडीया याने फ्रेंडरिक्वेस्ट पाठविली. त्याचा जाब विचारल्यासाठी जयेश जेवलानी हे त्याठिकाणी गेले असता, नितीन मकडीया व साहील मकडीया यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी नितीन मकडीया याने त्याच्या हातातील बॅटने जेवलानी यांच्या डोक्यावर वार केले तर साहील याने रॉडने त्यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांना जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली. जेवलानी यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे करीत आहे.