Wednesday, March 26, 2025
Homeक्राईमपळून जाण्यासाठी चोरट्यांनी उडी मारली मात्र लागला पोलिसांच्या हाती !

पळून जाण्यासाठी चोरट्यांनी उडी मारली मात्र लागला पोलिसांच्या हाती !

पळून जाण्यासाठी चोरट्यांनी उडी मारली मात्र लागला पोलिसांच्या हाती !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी -चोरीचा प्रयत्न करीत असताना घरातील सदस्यांना जाग आल्याने पळून जाण्यासाठी शहाकुब शेख ताजोद्दीन (२२, रा. कासमवाडी) याने पहिल्या मजल्यावरून उडी मारली, मात्र दुखापत झाल्याने पळता आले नाही व तो पोलिसांच्या हाती लागला.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, हा प्रकार रविवारी पहाटे गणेशवाडी परिसरात घडला. या प्रकरणी शहाकूबविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वेल्डिंग वर्कशॉपचे संचालक असलेले चेतन अशोक डहाके हे गणेशवाडी परिसरात राहतात. शनिवारी रात्री घरात झोपलेले असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांना कोणीतरी शिरल्याची कुणकुण लागली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्याने तेथून पळून जाण्यासाठी पहिल्या मजल्यावर उडी मारली. त्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पळून जाता आले नाही. मात्र त्याच्यासोबत असलेला साथीदार मात्र तेथून पळून गेला. आरडाओरडचा ऐकल्याने परिसरातील नागरिक त्यांच्या घराकडे गेले. यावेळी डहाके यांच्या शेजारी असलेला घराच्या कम्पाउंडमध्ये शहाकुब शेख ताजोद्दीन हा लपून बसला होता. यावेळी नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या