पाचोरा येथे दोन दुचाकीचा समोरासमोर धडकेतील जखमीचा मृत्यू
पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव-पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात जखमी दुचाकीस्वार प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना हडसननजीक गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू दलपत पाटील (५६, रा. वेरुळी खुर्द, ता. पाचोरा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. नांद्रा गावाहून वेरुळीकडे बापू पाटील व कृष्णा शिवाजी पाटील (वय ४३) हे दुचाकी क्रमांक (एम. एच. १९ सी. एल. ०४३३) येत होते. त्यावेळी पाचोऱ्याहून जळगावकडे जाणाऱ्या दुचाकीने (क्रमांक एम. एच. १९ बी. डब्ल्यू ११८५) समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बापू पाटील गंभीर जखमी झाले. त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत कृष्णा शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.