Sunday, April 27, 2025
Homeगुन्हापाण्याच्या मोटारी चोरी करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश; तिघांना अटक !

पाण्याच्या मोटारी चोरी करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश; तिघांना अटक !

पाण्याच्या मोटारी चोरी करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश; तिघांना अटक !

पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील पिंप्री गावातील चोरट्यांनी धरणावर शेतकऱ्यांनी धरणावर बसल्या होत्या. त्या पाण्याच्या मोटारी चोरुन त्या गावातील शेतकऱ्यांना कमी पैशांमध्ये विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चोरीच्या मोटारी घेणाऱ्यांकडून त्या मोटारी हस्तगत करण्यात आल्या तसेच चोरट्यांकडून दुचाकी देखील जप्त करण्यात आलया आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अटकेतील संशयितांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शासनाची परवानगी घेवून पिंप्री गावाजवळील मध्यम प्रकल्पात आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी मोटारी बसविल्या होत्या. परंतू पिंप्री गावातील चोरट्यांनी मोटारींचे पाईप कापून त्या मोटारी चोरुन त्या कमी किंमतीमध्ये शेतकऱ्यांना विकल्या होत्या. अनेक दिवसांपासून याबाबतची तक्रारी पिंपळगाव पोलीस ठाण्यात केल्या. या तक्रारींची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्रूा पथकाने संयुक्त कारवाईची मोहीम राबविली. यावेळी त्यांनी मोटारी चोरणाऱ्या राहूल त्र्यंबक पाटील, भगवान लक्ष्मण पाटील व सचिन बापू पाटील या संशयितांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी मोटारी चोरल्याची कबुली दिली. चोरट्यांनी चोरलेल्या मोटारी ज्यांना विकल्या त्यांच्याकडून १८ पाण्याच्या मोटार यासह चार दुचाकी देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ज्या शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीस गेल्या होत्या त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यामध्ये सातगाव डोंगरी, वाडी शेवाळे, शिंदाड, वडगाव येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही कारवाई सपोनि प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील, नरेंद्र नरवाडे, अमोल पाटील, इमरान पठाण, मुकेश तडवी, अभिजीत निकम, मुकेश लोकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शेखर डोमाळे, लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, रणजीत पाटील यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या