पाल आश्रमात भगवान रामदेवजी बाबा जम्मा जागरण भंडारा व शोभायात्रा
पाल ता रावेर :– कलयुग अवतारी लोकदेवता भगवान श्री रामदेवजी बाबा यांच्या जन्मोत्सवा निमित्त रावेर तालुक्यातील परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम पाल वृदावन धाम येथे दी १२ सप्टेबर रोजी रात्री जम्मा जागरण (भजन संध्या) चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याच बरोबर पाल आश्रमाचे विद्यमान पदस्थ व अखिल भारतीय संत समिति चे प्रदेश अध्यक्ष श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सनिध्यात श्री हरिधाम मंदिरात स्थित भगवान श्री रामदेवजी बाबा यांच्या मुर्तीचे पाठ
पूजन करून आरती करण्यात आली.दी १३ रोजी सकाली नऊ वाजेपासुन पाल गावात श्री हरिनामाच्या गजरातून भव्य शोभायात्रा काढून पाल आश्रमात महाआरती करून समापन करण्यात आले. त्या नंतर श्रद्धेय बाबाजी यांच्या सत्संग अमृत भगवान श्री रामदेवजी बाबा यांच्या उपदेशपर लाभ भाविकानी घेऊंन पाल येथिल अनारसिंग चव्हाण यांच्या तरफे भंडारा चे आयोजन करण्यात आले असुन हजारों भाविकानी महाप्रसादा चा लाभ घेतला.