पाल वृंदावन धाम आश्रमात 25 डिसेंबर ला संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी 15 वी पुण्यतिथी महोत्सव
रावेर पाल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी पूनमचंद जाधवपाल ता रावेर :- अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार व श्री वृंदावन धाम आश्रमाचे सस्थापक सद्गुरू परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांची दी 25 डिसेंबर रोजी 15 वी पुण्यतिथी (समाधी दिवस ) महोत्सव साजरा करण्याचे योजिले असून या साठी अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारंतर्फे तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे.
सातपुड्याच्या आदिवासी परिसरात आध्यात्मची अविरत गंगा वाहून देशभरातील लाखो भाविकाचा उद्धार करणारे ब्रम्हलीन सद्गुरू परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांची 15 वी पुण्यतिथी (समाधी दिवस ) महोत्सव दी 25 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार असून या महोत्सवासह पूज्य बापूजी चे गुरुवर्य ब्रम्हलीन संत श्री महादेव चैतन्य उर्फ दगडू जी बापू जयंती, पाल आश्रमात स्थित बन्सिपहाड दगडाने कला कृत भव्य श्री हरिधाम मंदिर वर्धापन दिवस असा योगायोग महोत्सवाचा त्रिवेणी संगम असून या साठी देशभरातून शेकडो संत महंत महामंडलेश्वर तसेच हजारो भाविक भक्त पूज्य बापूजी यांच्या समाधी दर्शनाकरिता दरवर्षा प्रमाणे यंदा ही येणार असून या करिता त्यांच्या सोयी सुविधेसाठी चैतन्य साधक परिवारंतर्फे पाल आश्रमात सत्संग पांडाल, भोजन व्यवस्था, संत निवास,
भक्तांकारिता निवास, जल, स्वछालंय, प्राथमिक उपचाराकरिता आरोग्य सुविधा, पार्किंग, अश्या विविध प्रकारच्या सोयी सुविधे च्या तयारीला पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात तसेच ब्रम्हचारी व साधक यांचे कडून सुरुवात करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता, तसेच अखंडित वीज पुरवठा, आणि रावेर मार्गे पाल तसेच सावदा मार्गे पाल साठी येणाऱ्या भक्ताकरिता परिवहन मंडळाच्या जादा बसेस यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून दी 24 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजे पासून रावेर येथुन मुंबई समिती तसेच परिसरातील भाविकांची पाल ला पायी दिंडी येणार असून रात्री 8 ते 10 ला आश्रमाचे विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांचे सत्संग, दीपोत्सव आणि भजन संध्या व दी 25 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजे पासून पाल येथील श्री हरिधाम मंदिरात स्थित परम पूज्य बापूजी यांच्या समाधी स्थळी पादुका पूजन व अभिषेक तसेच 7 वाजे पासून ध्यान, प्रार्थना, गुरुदिक्षा, व 10 वाजेपासून उपस्थित संतांचे श्रद्धावचन, महा आरती, व शेवटी पाल समिती तर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असून या महोत्सवात सर्व भाविक भक्त सादर आमंत्रित असल्याचे आवाहन चैतन्य साधक परिवार समिती तर्फे करण्यात येत आहे.